पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्याचं निधन झालं आहे. काँग्रसचे संकटमोचन म्हणूनही मुखर्जींना म्हटलं जात होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रणवदा यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट केलं आहे.

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण देश दुःखी आहे. त्यांनी देशाच्या विकासाच्या मार्गावर उत्तम छाप सोडली आहे. ते एक उत्कृष्ट अभ्यासक असून राजकीय स्पेक्ट्रम आणि समाजातील सर्व घटकांमध्ये त्यांचं कौतुक केलं जात असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना 10 ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस उपाचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही त्यासोबतच प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झालं होतं.

राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता.

अनेक राजकीय नेत्यांनी सोशल माध्यमांच्याद्वारे प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांदजली वाहिली आहे. माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

प्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराज

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा आणि कशा पद्धतीने होणार?; राज्य सरकारने केलं जाहीर!

इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरावं, हा काय तमाशा चाललाय- संजय राऊत

…तर सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण विरोधकांच्या अंगलट येईल- रावसाहेब दानवे