मुंबई | आपल्या आवाजाने अनेक पिढ्यांवर गारूड निर्माण करणाऱ्या आणि आपलं संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला अर्पण करणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे सुद्धा मुंबईत शिवाजी पार्कवर येऊन लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लतादीदींच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
या काळात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. तसेच संसद, मंत्रालय, सचिवालय, विधानसभांसह देशातील सर्व सरकारी कार्यालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे.
दुपारी 12.15 वाजता त्यांचे पार्थिव ब्रीच कँडितून परेड रोड येथील त्यांच्या प्रभू कुंज येथील निवासस्थानी दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर 6.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी आणि लतादीदींचं बहिण भावाचं नातं होतं. मोदी पंतप्रधान व्हावेत अशी जाहीर इच्छाही लतादीदींनी बोलून दाखवली होती. आज लतादीदींचं निधन झाल्याने मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
दुपारी साडेचार वाजेपर्यंत मोदी मुंबईत येऊन लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती दिली. लतादीदी यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार
कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, मातृतुल्य आशीर्वाद हरपला- उद्धव ठाकरे
…म्हणून लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही, ‘हे’ होतं कारण
लता दीदी आम्हाला सोडून गेल्या, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे- नरेंद्र मोदी