नवी दिल्ली |अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. मात्र भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळत या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोक भारताकडे अधिक मजबूत रूपाने पाहत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत.
“भारताचा जीडीपी (GDP) 2 लाख 30 हजार कोटींच्या आसपास आहे. सध्या भारताचे परकीय चलन साठा 630 अब्ज डॉलर पार झाला आहे. 2013-2014 मध्ये भारताची निर्यात 2 लाख 85 हजार कोटी इतकी होती.
आज भारताची निर्यात 4 लाख 70 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या सात वर्षात आपल्या सरकारने 3 कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवलं आहे”, असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत (Lok Sabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, दुर्दैवाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या भाषणात त्या मुद्द्यांची एक मोठी यादी होते, ज्याबाबत सरकार सातत्यानं दावा करतं. राष्ट्रपतींचे अभिभाषणात ब्यूरोक्रॅटिक विचारांचा उल्लेख होता. त्यांच्या अभिभाषणात सरकारसमोर मोठी आव्हानं असलेल्या एक दोन मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं नाही की, भारत आज विभागला गेलाय. आज भारत एक नाही तर भारताचे दोन तुकडे झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ना चौकार ना षटकार, अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पठ्ठ्यांनी मॅच जिंकली; पाहा व्हिडीओ
BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम
IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता