नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. अमेरीकेतील एका सर्वेक्षणानुसार ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत.
अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंट फर्म द मॉर्निंग कन्सल्टच्या (Data Intelligent Firm The Morning Consult) सर्वेक्षणानुसार पंतप्रधान यांनी या लढतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन (Jo Biden) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एन्थोनी अल्बेनेस (Anthony Albanese) यांना मागे टाकले आहे.
या लढतीत जगातील 22 नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे सोडले आहे. नरेंद्र मोदी यांनी यात 75% इतके मतधिक्य मिळवले. या लढतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन 11 व्या स्थानी आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मेनुएल लोपेज ओब्रोडर (Andres Manuel Lopez Abrodar) आहेत. त्यांना 63% लोकांनी मते दिली आहेत. हे सर्व सर्वेक्षण या वर्षी 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट काळात करण्यात आले होते.
द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींचे मे 2021 साली डिसअप्रुव्हल रेटिंग (लोकप्रियतेची घट) ही सर्वाधिक होती. त्यावेळी भारतात कोरोनाने मोठा आहाकार माजविला होता.
परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाने कोरोनावर तोडगा काढत परिस्थिती आटोक्यात आणली होती. आणि आता भारत पूर्णपणे टाळेबंदीतून उठला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचें अप्रुव्हल रेटिंग मे 2020 साली सर्वाधिक 84% होते. आता त्यांनी जगातील बड्या बड्या नेत्यांना मागे सारत लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अग्रस्थान गाठले आहे.
महत्वाच्या बातम्या –
निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा
कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’च्या नावावरुन शिवसेनेने शिंदे गटाला दिले नवीन नाव
‘कोण होतीस तू, काय झालीस…’; गाण्यातून किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला
एकपात्री विनोदवीर मुनव्वर फारुकीच्या दिल्लीतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली; ठोस कारण…
“शिंदे गेले ते बरेच झाले, असंगाशी…”; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर मोठी टीका