तुम्ही कोणते टगे पोसत आहात ते पाहा- प्रीतम मुंडे

बीड | जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिले पाहिजे. आपण कोणते टगे पोसत आहोत हेही पाहा, अशी टीका खासदार प्रीतम मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर केली आहे. त्या बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे. आपण कोणते टगे पोसत आहात ते त्यांनी पाहिलं पाहिजे. केंद्रातून जिल्ह्यात मी काय आणलं हे पाहायचं असेल तर परळी नगरपालिकेच्या बाहेर पडून बघा, अशी टीका प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी मला मेळाव्याला येता आलं नाही. मात्र यंदा उस्ताह आहे. हा मेळावा कष्टकऱ्यांचा आहे. भगवान बाबांच्या अनुयायांचा आहे. गतवर्षी गुन्हे दाखल झाले बीड जिल्ह्यात खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे, असं प्रीतम मुंडे म्हणालेत.

मेळाव्यानंतर सत्ताधाऱ्यांचे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले. केक कापले गेले, जेसीबीने फुले उधळली गेली. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या-

“आता नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मिळतील याची काही शाश्वती नाही”

वर्मावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले…

आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका- चित्रा वाघ

काय सांगता! एकटा कुत्रा चक्क दोन-तीन वाघांना भिडला, पाहा व्हिडीओ