बीड | स्वत:चा दोष झाकण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार सतत केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम करत आहे. सगळे दोष मोदी सरकारचे असतील, तर राज्यही केंद्राकडे चालवायला द्या, असा टोला भाजप नेत्या आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
ठाकरे सरकारची अवस्था ही नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. त्या बीडमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
सर्वसामान्य नागरिकांनी ठाकरे सरकारची कामगिरी डोळसपणे पाहावी आणि सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी. बीडच्या रेल्वेला राज्य सरकारकडून मदत नाही, असं प्रीतम मुंडे म्हणालेत.
केवळ 19 कोटी राज्य सरकारने दिले. केंद्राने भरपूर मदत केली आहे. राज्य सरकारने वाटा दिला, तर 2024 पर्यंत रेल्वे येईल. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, असंही प्रीतम मुंडे यांनी सांगितलं आहे.
राज्यात लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे. बीड जिल्ह्याची मान खाली जात आहे. या सरकारमध्ये दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न अनुत्तरित आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पक्ष म्हणून बेदखल केलं जातं की नाही हे मला माहिती नाही. पण आज इथं कोण कुणाच्या हातचं बाहुलं आहे हे सर्वांना माहिती असल्याचा टोलाही प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लगावला आहे.
नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत, अशी टीकाही प्रीतम मुंडे यांनी केलीये.
रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नाही, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केलाय.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मला कसलीही अपेक्षा नाही. पदामुळे परिणाम होईल असं वाटत नाही. माझं काम सुरू आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही बाबरी पाडली असं उद्धव ठाकरे सभागृहात सांगतात, तेव्हा राष्ट्रवादीला लाज वाटत नाही का?”
‘पदामुळे काही होत नाही…’; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
“मला माफ करा, पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन पण…”
“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”