त्यामुळे पक्षाचं चिन्ह या कार्यक्रमस्थळी लावण्याचा प्रश्नच येत नाही- प्रितम मुंडे

मुंबई | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उद्या गोपीनाथ गडावर कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर खासदार प्रितम मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंडेसाहेबांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तो गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेला आहे. हा राजकीय कार्यक्रम नाही त्यामुळे पक्षाचं चिन्ह या कार्यक्रमस्थळी लावण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत प्रितम यांनी पक्षाच्या चिन्हावरून होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमाच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नसल्याने पंकजा यांनी वेगळा मार्ग तर निवडला नाही ना? असा प्रश्न चर्चेला जात आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे माझ्या नेत्या आहेत. त्यांच्या निर्णयाचा मला कायमच आदर वाटतो. त्या जो काही निर्णय तो मला मान्य असेल, असंही प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांंच्या उद्याच्या भाषणाकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-