पुणे : लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपचा छुपा पाठिंबा होताच. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
देशभरात जे विरोधक भाजपमध्ये येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले जाते आहे, असाही आरोपही चव्हाण यांनी केला.
आघाडी सरकारच्या काळात देखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजावर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणं पुढे येत आहे. त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची संबधितावर कारवाई केली जात नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बॅंकाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार हे अद्यापही योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच दिसेल; मुख्यमंत्र्याचं भाकित – https://t.co/ABL9QwVOvB @Dev_Fadnavis @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
‘हा’ गोलंदाज मोडणार कपिल देव, जहीर खान, हरभजन सिंग या दिग्गजांचा विक्रम! – https://t.co/nWdM9CdoGN @BCCI @harbhajan_singh @therealkapildev @ImIshant @ICC
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
सोलापुरातील अमित शहांची सभा उधळवून लावू- भीम आर्मी – https://t.co/F3whL8Q8Lp @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019