पृथ्वीराज चव्हाण यांचं हे आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारतील का?

सातारा | देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज आणि किती रोख खर्च मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी दिली तर दिलासा मिळेल, अधिक स्पष्टता येईल आणि सकारात्मक चर्चा होईल, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे 2 लाख 70 हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच त्यांनी विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासवण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त दोन लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे (फिस्कल स्टीम्युलस) आहेत आणि उर्वरित पॅकेज हे कर्जाच्या स्वरुपातील (मॉनेटरी स्टीम्युलस) आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त 20 हजार कोटी रुपये येऊ शकतात, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करुन देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आणि ती रक्कम जवळपास 1 लाख 60 हजार कोटी आहे, असं सांगितलं. ही दिशाभूल आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

-‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

-काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना रिंगणात तर बाबांच्या हाती छडी!

-मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही- उद्धव ठाकरे

-होय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे