माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | माझं ट्विट नीट बघा. मी फक्त मंदिराचं सोनं घेण्याचा उल्लेख केला नव्हता. धार्मिक स्थळांचं सोनं घेण्याचा उल्लेख केला होता. धार्मिक स्थळ म्हणजे फक्त हिंदू धर्माची मंदिरं अशी मानसिकता निर्माण झालेली आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

देशाचा एक नागरिक म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. मला नागरिक म्हणून पंतप्रधानांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. धार्मिक स्थळांकडून सोनं कर्ज रुपाने घ्यावं. त्यावर व्याज द्यावं, असा सल्ला दिला होता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

धार्मिक स्थळांकडून सक्ती करुन किंवा हिसकावून घ्या, असं मी म्हटलं नव्हतं. माझ्या ट्विटमध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,भाजपने जाणूनबुजून मंदिराचं सोनं काँग्रेस पक्षाला घ्यायचं आहे, असा विपर्यास केला आहे. ते सोनं मला द्या किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात द्या, असं मी म्हटलेलं नाही. मी फक्त पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला त्यांनी स्वीकारावा किंवा कचरा पेटीत फेकून द्यावा, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या-

-अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

-मुख्यमंत्री कमी पडत आहेत असं मी म्हणालोच नाही- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोना झाल्याचं कळलं तेव्हाच मी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये…-जितेंद्र आव्हाड

-21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम; ‘या’ पाच जणांवर दिली जबाबदारी

-‘या’ जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प