मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या आणि खासकरुन काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेसच्या 11 आमदारांनी पक्षाच्या व्हिपविरोधात मते केल्याचे समोर आले होते. यावर आता पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकांत काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला (BJP) मते दिली असल्याचा खळबळजनक खुलासा चव्हाणांनी केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
त्यांनी याबाबत स्पष्ट विधान केले नाही. त्यांनी विधान परिषदेतील निवडणुकांत आर्थिक व्यवहार झाल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी उलथापालथ झाली आहे.
चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) या आमच्या सहकाऱ्यावर अन्याय झाला. तसेच मी या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
याप्रकरणी पक्षाने एक समिती नेमून, तिला अहवाल सादर करायला सांगितले पाहिजे आणि पक्षाच्या विरोधात मते देणाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर देखील टीका केली.
महत्वाच्या बातम्या –
नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे सर्वेक्षण
निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा
‘कोण होतीस तू, काय झालीस…’; गाण्यातून किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला
कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’च्या नावावरुन शिवसेनेने शिंदे गटाला दिले नवीन नाव
एकपात्री विनोदवीर मुनव्वर फारुकीच्या दिल्लीतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली; ठोस कारण…