लोकांकडे पैसेच नाहीत तर उत्पादन केलेल्या वस्तू कोण घेणार?; पृथ्वीबाबांचा मोदींना सवाल

पुणे | मोदी सरकारने 20 लाख काेटींचे पॅकेज जाहीर केले असले तरी त्यामधून गरीब, मजूर, शेतकरी व नाेकरदारांच्या हातात काहीच पैसे मिळार नाहीत म्हणून या पॅकेजचा अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होणार नाही. आपल्याकडे उत्पादन निर्मिती केली जात असली तरी जाेपर्यंत लाेकांच्या हाती पैसे येणार नाहीत ताेपर्यंत या वस्तू खरेदी काेण करणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केला आहे.

ब्रिटनच्या सरकारने तेथील मजुरांना सव्वा 2 लाख रुपये व अमेरिकेने 70 हजार दरमहा मदत केलेली आहे, मग ती सरकारे वेडी आहेत का? आपल्याकडे लाॅकडाऊन शिथिल करताना उद्योग सुरू करून अन‌् उत्पादन निर्मिती केली जात असली तरी लोक वस्तू खरेदी कश्या करणार, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

काेराेनामुळे जीव वाचवायचा की राेजगार, असा प्रश्न आज मजुरांसमाेर आहे. माझ्या मते डिसेंबर 2021 पर्यंत काेराेनावर लस येण्याची शक्यता नाही, त्यामुळे पुढचा काही काळ आपल्याला काेराेनासाेबत राहण्याची मानसिकता करावी लागेल. इंग्लंड, अमेरिका, जर्मनीसह इतर देशांनी तेथील मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत. जाेपर्यंत या लाेकांच्या हाती पैसे येणार नाहीत ताेपर्यंत ते वस्तू खरेदी करू शकणार नाहीत, असं ते म्हणाले.

अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर जून महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने मिनी अंदाजपत्रक जाहीर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. अर्थव्यवस्था रुळावर यावी, यासाठी केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून थेट मदत फक्त दोन लाख कोटींची होणार आहे. उर्वरित रकमेचे पॅकेज संभ्रम निर्माण करणारे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

धारावीत अवघ्या 15 दिवसांत कोविड रूग्णालय बांधून तयार, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

-मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिलीये पण….- संजय राऊत

-‘निसर्ग’ चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘प्लॅन’!

कौतुकास्पद… आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याच्या जनतेला दिल्या 2 मोठ्या गुडन्यूज