Top news पुणे महाराष्ट्र

“खडसेंना बाजूला करण्यात यांचा डाव; राज्यातील भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही”

पुणे |  एकनाथ खडसेंना बाजूला सारण्याची ताकद राज्यातील भाजप नेत्यांमध्ये ताकद नाहीये. त्यांना बाजूला सारण्याचा डाव हा दिल्लीत रचला गेला आहे, असा अंदाज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन वार्तालापात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणापासून ते केंद्रिय राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं.

एकनाथ खडसे यांना भाजपने सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना वारंवार लक्ष्य करण्यात आलं. आणि हे करण्याला दिल्लीश्वरांचा हात असल्याशिवाय महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही, असं चव्हाण म्हणाले.

भाजपमध्ये आता लोकशाही राहिलेली नाही. पूर्वी सगळ्यांना विचारून निर्णय घेतले जायचे. आता एक-दोघे जण मिळून सारे निर्णय घेतात. पक्ष कोणत्या दिशेने जात आहे, याचा आता आम्हाला विचार करावा लागेल. भाजपने जर मला अशीच वागणूक दिली तर कोरोनाचं संकट टळल्यावर मी माझा निर्णय घेऊन, असा इशारा खडसे यांनी पक्षनेतृत्वाला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अहो, त्याचा 1 वर्षाचा मुलगा गेलाय हो… ढसढसा रडणारच की!

-“मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही परप्रांतीय हातात, शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”

-माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, घरातील कुणी नाही- नितीन गडकरी

-पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

-केंद्राने सावकाराचं काम करू नये; मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे- राहुल गांधी