मुंबई | ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेला गाऊन चांगलाच चर्चेत आला होता. तिने घातलेल्या डीपनेक गाऊनवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. अगदी काही जणांनी तिला भारतीय संस्कृतीचे दाखले देत आपल्या देशात असले प्रकार चालणार नाहीत वगैरे…..वगैरे, अशी अक्कल देखील शिकवली. यानंतर या ट्रोलर्सना प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
प्रियांकाने घातलेला ड्रेस तिच्या शरीरावर घातला आहे. ते तिचं शरीर आहे आणि तिला देवाने सुंदर शरीर दिलं आहे. तिनं कसाही ड्रेस घालो त्याचं तुम्हाला काय करायचंय…. तिच्या शरीराबरोबर ती काहीही करू शकते, अशा शब्दात मधू चोप्रा यांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे.
एखाद्याबद्दल वाईट बोलल्याने लोकं आपल्याकडे लक्ष देतील असं या ट्रोलर्संना वाटतं. अशा ट्रोलर्सला मी जास्त किंमत देत नाही, असंही मधू चोप्रा यांनी म्हटलं आहे.
प्रियांका तिच्या मनानुसार आयुष्य जगते. जोपर्यंत ती इतर कोणाला त्रास देत नाही किंवा इजा पोहचवत नाही तोपर्यंत तीने हवं तसं जगण्यात मला काही चुकीचं वाटत नाही, असंही प्रियांकाच्या आईने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-……म्हणून सुपर ओव्हरच्या ‘सुपर’ विजयानंतरही भारतीय संघाला मोठा दणका!
-मटन खाल्लं म्हणून हिणवणाऱ्या किरीट सोमय्यांना जितेंद्र आव्हाडांचं रोखठोक प्रत्युत्तर!
-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला 17 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम!
-मोदी सरकारने बजेट मांडल्यानंतर या’ वस्तू होणार स्वस्त…. तर ‘या’ वस्तू महागणार!
-आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही- अशोक चव्हाण