“एक दिवशी भाजपला कळेल प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही”

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी अखेरपर्यंत प्रयत्न केले तरीही ते आपलं सरकार वाचवू शकले नाहीत. कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ हे यशस्वी झालं. याच प्रर्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कर्नाटकमध्ये कुमारस्वामींचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपला एक दिवशी कळेल की प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी भाजपला सुनावलं आहे. यासंदर्भात प्रियांका गांधींनी ट्वीट केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेलं सत्तानाट्य अखेर मंगळवारी संपुष्टात आलं. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधकांना 105 मतं पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळलं आहे.

कुमारस्वामींचं सरकार कोसळल्याने कर्नाटकमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरूनच प्रियांका गांधींनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-निवडकर्त्यांचं काम लोकांना खूश करणं नाही- सौरभ गांगुली

-काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार पण…; प्रकाश आंबेडकरांनी घातली ‘ही’ अट!

-आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणारा विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

-अण्णा हजारेंचा इशारा; मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार!

-चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग