नवी दिल्ली : चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा अर्थिक वृद्धीदर घसरला असल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे देशाच्या अर्थकारणात चिंतेचं वातावरण आहे. घटलेल्या जीडीपीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता काँग्रेसच्या सरतचिटणीस प्रियांका गांधी यांनीही टीका केली आहे.
‘अच्छे दिन’चा नारा भोंगा वाजवणाऱ्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केलं आहे, असं टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.
मोदी सरकराच्या अर्थिक धोरणांचा समाचार घेणारे ट्वीट प्रियांका गांधी यांनी केलं आहे. ‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या भाजप सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केले आहे. ना जीडीपी वाढत आहे ना रुपया मजबूत होत आहे, हे घटलेल्या अर्थिक विकासदरावरुन स्पष्ट होतं. रोजगारीही मोठ्या प्रमाणावर घटत असल्याचं प्रियांका गांधींनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.
दरम्यान, देशाच्या अर्थिक बट्ट्याबोळासाठी कोण जबाबदार आहे. हे आतातरी स्पष्ट करा, असंही प्रियांका गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता शेवटी फक्त भाजप- प्रताप पाटील चिखलीकर – https://t.co/amVEkYkAVu @PratapPatil_PPC @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
“नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदी पलिकडचा” – https://t.co/mKsCWhfZdw @ChDadaPatil @MeNarayanRane @ShivsenaComms @Dev_Fadnavis @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
आदित्य ठाकरे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार! – https://t.co/DlGEFVSbW9 @AUThackeray @ShivsenaComms
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019