निवडणुकीच्या आधी धक्कादायक खुलासा, फक्त राहुल गांधीच नाही तर प्रियंका गांधी देखील….

नवी दिल्ली | राज्यातील सामान्य शहरापासून देशाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजधानी दिल्लीपर्यंत सर्वांच्या नजरा जागतिक स्तरावरील पेगासस नावाच्या साॅफ्टवेअरवर पडल्या. जेव्हा हे पेगासस प्रकरण समोर आलं.

पेगासस या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींची हेरगिरी केल्याचा आरोप देशभरातून केंद्र सरकारवर ठेवण्यात आला होता. परिणामी देशाचं राजकारण तापलेलं होतं. आता परत एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदर काही दिवसांपूर्वी पेगाससच्या माध्यमातून भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या अन् देशात मोठा गोंधळ निर्माण झाला.

पत्रकार, वकील, न्यायाधीश, राजकीय नेते, केंद्र सरकारमधील मंत्री, विरोधी पक्षनेते, राज्याचे नेते अशी एकापेक्षा अनेक क्षेत्रातील मान्यवरांची नावं या हेरगिरी प्रकरणात पुढं आली होती.

आता परत एकदा देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका सुरू होण्याच्या अगोदर पेगासस प्रकरणातील नवी यादी समोर आली आहे. या यादीतील नावांनी देशात खळबळ माजली आहे.

इस्रायली मीडियानं काॅंग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशात भाजपच्या विरोधात आक्रमकपणे प्रचार करत असलेल्या नेत्या प्रियंका गांधी यांचाही पेगासस हेरगिरी प्रकरणात नाव होतं, अशी माहिती समोर आली होती.

प्रियंका गांधीच्या नावाचा उल्लेख झाल्यानं देशात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी सातत्यानं भाजपच्या विरोधात मोठ्या तयारीनं मैदानात उतरून उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करत आहेत.

प्रियंका गांधी यांचीही हेरगिरी केली जात असल्याची माहिती आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधीनी त्यांच्या मुलांची इन्स्टाग्राम अकांऊटवर नजर ठेवली जात असल्याची तक्रार केली होती.

दरम्यान, काॅंग्रेसचा चेहरा असणारे खासदार राहुल गांधीनी मोदी सरकारला पेगाससचा चुकीचा वापर केल्याचा आरोप केला होता. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधींचं नाव समोर आल्यानं उत्तर प्रदेशात राडा होण्याची चिन्ह आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…