कडाक्याच्या थंडीमुळे उद्भवतात समस्या; अशी लक्षणं दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला

मुंबई | सध्या राज्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट आल्यातं चित्र आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या बहुतांश भागामध्ये किमान तापमानाची हळूहळू घट होत असल्याचं दिसून येतंय.

अशातच आता राजधानी मुंबईत रेकाॅर्डब्रेक थंडी पहायला मिळतीये. मागील दोन दिवसांपासून मुंबईचा पारा खाली गेला आहे. त्यामुळे कधी थंडी न जाणवणाऱ्या मुंबईत शेकोट्या पेट्या आहेत.

तापमान घसरण्याने आता अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. पारा खाली गेल्याने आता श्वासोच्छवासाच्या समस्या वाढल्याची माहिती मिळतीये. मागील आठवड्यात श्वासनाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या तब्बल 40 ते 45 टक्क्यांपर्यंत आली आहे.

त्याचबरोबर सर्दी-खोकला, डोकेदुखी, विषाणू संसर्गात देखील वाढ झाली आहे. तापमान आणि हवामानातील चढ-उतारांमुळे वायरल ताप आणि फ्लू सारखी लक्षणं वाढत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

सध्या सर्वच घरात सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्ण आढळत आहेत. अनेकांना कोरोना संसर्गसारखी लक्षणं दिसूून येत आहेत. मात्र, त्यातील अनेकजणांची रूग्ण कोरोना टेस्ट निगेटिव्ह सापडत आहेत.

कोरोना लक्षणं असून देखील जर कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत असेल तर रूग्णांनी लगेचच आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

दरम्यान, व्हायरल आजार आणि श्वासोच्छवासाच्या समस्या असणाऱ्या रूग्णांनी त्वरित डाॅक्टरांना दाखवून उपचार घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर थंडीमध्ये योग्य ती काळजी घेणं देखील गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Omicron किती वेळ जिवंत राहू शकतो?, अभ्यासातून सर्वात मोठा खुलासा झाला

सचिन तेंडूलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आता उशीर झालाय पण, रोहित-राहुलची जोडी…”

मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं…

आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता