Nagpur | नागपूर-कन्हान-मनसर मार्गावर असलेल्या रेनबो लॉजमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात कन्हान पोलिसांना (Kanhan Police) यश आले आहे. रविवारी (19 जानेवारी ) पोलिसांनी या लॉजवर धाड टाकून दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून 51,824 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाल्मिक कराड गँगविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडला, ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज व्हायरल-
हल्ल्यानंतर सैफ-करिनाने घेतला मोठा निर्णय, सगळीकडे एकच चर्चा!-
पोलिसांकडून त्या वस्तू जप्त-
मनोहर चिरकूट हूड (Manohar Chirkut Hood) (वय 47, रा. टेकाडी, ता. पारशिवनी – Tekadi, Tah. Parshivani) आणि वेदांत राजेंद्र लंगडे (Vedant Rajendra Langde) (वय 19, रा. वहऱ्हाडा, ता. पारशिवनी – Varhda, Tah. Parshivani) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनोहर हूड याचे टेकाडी शिवारात रेनबो नावाचे लॉज आहे.
या लॉजवर (Nagpur) देहव्यापार (Prostitution) चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक (Bogus Customer) पाठवून खातरजमा केली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 30 हजार रुपयांचा मोबाइल फोन (Mobile Phone), 16 हजार 220 रुपये रोख (Cash), 5 हजार 534 रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR), कंडोम (Condoms) आणि रजिस्टर (Register) असा एकूण 51 हजार 824 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, पोलिसांनी देहव्यापारासाठी बोलावलेल्या एका तरुणीची सुटकाही केली.
रूम उपलब्ध करून देऊन तरुणींना दाखवले जात होते आमिष-
या (Nagpur) लॉजमध्ये शरीरसंबंधांसाठी रूम उपलब्ध करून दिल्या जात होत्या. तसेच, तरुणींना आर्थिक आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले जात होते, अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालक मनोहर हूड आणि उपव्यवस्थापक वेदांत लंगडे या दोघांना अटक केली आहे.
पुढील तपास सुरू-
या प्रकरणी पोलिसांनी स्त्रिया व मुली अनैतिक देहव्यापारी प्रतिबंधक अधिनियम 1956 (Immoral Traffic (Prevention) Act, 1956), कलम 3, 5 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.