कर्नाटक सरकारचं भवितव्य आज ठरणार

बंगळुरु : कर्नाटकमधील काही बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस आणि जेडीएसला कर्नाटकात मोठा दणका बसला आहे. 

शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी याबाबत कुमारस्वामींना पत्र लिहलं आहे.

कर्नाटकातल्या 11 आमदारांनी राजीनामा दिल्यापासून कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. जेडीएस आणि काँग्रेसला कर्नाटकची सत्ता गमवण्याची वेळ आल्याचं दिसत आहे. विश्वासदर्शक ठरावाशिवाय विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं. 

काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी तडकाफडकी अमेरिकेहून निघून आले होते. तेव्हापासून सत्तासंघर्षाला सुरवात झाली. 

कर्नाटकमध्ये भाजप पैशाच्या जोरावर सरकार अस्थिर करत आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. तसेच कर्नाटकमध्ये आमदारांना फोडण्याचं काम अमित शहा यांनी केलं असल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या वादाशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांना आपल्या घरातले भांडण सोडवता येत नाही. त्याच खापर ते आमच्यावर फोडतात, असं प्रत्युत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांचा यू-टर्न, अखेर विरोधकांच्या सुरात मिसळला सूर!

“कुलभूषण जाधव यांना सुखरुप आणणे हाच सरकराचा खरा पुरुषार्थ ठरेल”

-तिकीट मिळण्याआधीच रोहित पवारांची ‘विकेट’???

-शिवाजीराव आढळराव पाटलांची मस्ती जिरली- अजित पवार

-‘सैराट’सारखं हत्याकांड!!! एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेप