पायी जाणार्‍या मजुरांना पाणी, जेवण उपलब्ध करून द्या; आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे |  गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. वाहनांची सोय होत नसल्याने अनेक मजूर कुटुंबासमवेत पायीच आपल्या घरी जायला निघाले आहेत. रखरखत्या उन्हात, हे मजूर मजल दरमजल पायपीट करीत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या मजुरांसाठी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर पाणी आणि जेवणाची सोय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावी, असं आवाहन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

सरकारने अशा स्थलांतरित मजुरांसाठी सर्व सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे महामार्गावर राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी तातडीने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसंच त्यांना गरजेच्या वस्तू द्यावात, अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा, तालुका आणि गाव कमिटी अध्यक्षांना केली आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात मोठ्या प्रमाणात मजुरांचं स्थलांतर होत आहे. त्यामुळे राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर जाणाऱ्या मजुरांसाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था करावी, असं आवाहन आंबेडकरांनी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. सध्या माणुसकी धर्म सर्वात मोठा धर्म आहे. आपण तो या संकटाच्या काळात जपला पाहिजे. म्हणूनच थकल्या भागल्या मजुरांना अन्न-पाणी देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

-“२ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही”

-…त्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्या ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा- संजय राऊत

-कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती

-काळा पैसा भारतात आणण्याची मोदींना संधी; शिवसेनेचा सल्लावजा टोला