मुंबई | ईडी आणि सीबीआयकडे सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांविरोधात गंभीर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कोणतीही कारवाई करत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
एकामागोमाग एक सरकारी संस्थांचा गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या सर्व संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार काम करण्याऐवजी सरकारच्या ईच्छेनुसार काम सुरू आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, अशी चिंता चव्हाण यांनी व्यक्त केली.
सरकारी चौकशी संस्था ठराविक लोकांवरच कारवाई करताना दिसत आहे. खरोखरच चौकशी समित्यांनी गुन्हा शोधून गुन्हेगारांवर कारवाई केली आणि त्यांना शिक्षा केली तर आपण समजू शकतो, असं ते म्हणाले.
5 वर्ष काहीच करायचं नाही आणि निवडणूक जवळ आली की हे प्रकार करायचे. जे सरकारचे विरोधक आहेत त्यांच्याविरोधातच कारवाई करायची हे बरोबर नाही, असंही चव्हाण म्हणाले.
शिवसेना मंत्रिमंडळ बैठकीत काहीच बोलत नाही आणि बाहेर येऊन आपण विरोधी पक्ष आहोत अशी भूमिका घेते. मंत्रीमंडळात काही न बोलता बाहेर बोलणं हा निव्वळ दांभिकपणा आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
जनतेनं आमदारांना, खासदारांना आपलं काम आपापल्या सभागृहात करावं म्हणून निवडून दिलं आहे. जे मंत्रिमंडळात आहेत त्यांनी मंत्रिमंडळात प्रश्न सोडवले पाहिजेत, असा प्रेमाचा सल्ला देखील त्यांनी शिवसेनेला दिला.
महत्वाच्या बातम्या-
-पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीला जायला तयार- देवेंद्र फडणवीस
-मराठीत फलक दिसला पाहिजे….; राज ठाकरे यांची ईडीला नोटीस
-सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे- उद्धव ठाकरे
-मुख्यमंत्री एमबीए आहेत, याचा अर्थ असा की…; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
-संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड