मला देखील भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण…; पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

पुणे : मला भाजपप्रवेशाची ऑफर होती. मात्र ती गंभीर नव्हती तर गमतीतच होती,  अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.

कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

भाजपप्रवेशाची सिरीअस ऑफर नव्हती. मात्र आमच्याकडे या तुमचा चांगला उपयोग होईल, असं गृहमंत्री अमित शहांनी गंमतीत म्हटल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मी गेली पाच वर्ष या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असं चव्हाणांनी सांगितलं.

दरम्यान, साताऱ्यात होणाऱ्या पोटनिडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र याबाबत थेट उत्तर देण्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी टाळलं आहे.

महत्वाच्या बातम्या-