“भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका

मुंबई | विविक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट (The Kashmir Files) नुकताच रिलीज झाला आहे. देशात सध्या हा चित्रपट चर्चेचा विषय बनलाय. राजकीय वर्तुळात देखील याचीच चर्चा होताना दिसत आहे.

नव्वदीच्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या घटनेवर भाष्य करणारा हा चित्रपट सर्व क्षेत्रात सध्या चर्चेचा विषय आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर मी निशब्द आणि स्तब्ध झालो. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने हा सिनेमा पहायला हवा, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

विशेषत: भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने तर हा सिनेमा नक्कीच पहायला हवा, अशी बोचरी टीका देखील फडणवीसांनी यावेळी केली आहे.

ज्यांना इतिहास माहिती नसतो, त्यांना वर्तमान तर असतं मात्र भविष्य नसतं. त्यामुळे हा इतिहास आपल्याला समजून घ्यावाच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, हा सिनेमा कोणाच्या जातीधर्माविरोधात नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”

Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्‍या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”