मुंबई | कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर सापडलेल्या ड्रग्जमुळे गेल्या वर्षी एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार म्हणून प्रभाकर साईल यांच्यासह काही जणांनी काम केलं होतं. मात्र प्रभाकर साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी प्रभाकर साईल यांचं निधन झालं आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी झालेल्या कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल, मनिष भानुशाली आणि अन्य साक्षीदारांनी केलेल्या आरोपांची चौकशीही करण्यात आली होती. साक्षीदार प्रभाकर साईलचा जवाब नोंदवण्यात आला होता.
प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोपही प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी
Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी
मोठी बातमी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्याचा कार्यक्रम होणार?
Anil Parab: “आता पुढचा नंबर अनिल परबांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी”
Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं