Top news पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘गोल्ड’मॅन कायमच हरले आयुष्याची लढाई

पुणे |  पुण्यात आतापर्यंत तीन गोल्डमॅन होऊन गेले. ते तीनही गोल्डमॅन त्यांच्या त्यांच्या श्रेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या जीवनात त्यांना भरपूर प्रसिद्धी लाभली. सकाळपासून रात्रीपर्यंत 5 ते 10 किलो सोनं अंगावर ते मिरवत असत. पण आयुष्याच्या लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिले रमेश वांजळे… दुसरे दत्ता फुगे…. अन् तिसरे सम्राट मोझे…

आपण प्रथमत: जाणून घेऊयात रमेश वांजळे यांच्याबद्दल-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडवासल्याचे आमदार आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध होतेच परंतू त्यांच्या अंगावरील सोन्यासाठी त्यांना खास ओळखले जायचं. संपूर्ण महाराष्ट्रात सोनेरी आमदार म्हणून ते परिचीत होते. त्यांची धडधाकट तब्येत आणि त्यावर किलोने सोनं हे लोकांचं आश्चर्य होते. लोक त्यांना बघायला गर्दी करायचे. सगळं काही सुरळीत चालू असताना 2011 च्या जूनमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 44 वर्षांचे होते.

जाणून घेऊयात दत्ता फुगे यांच्याबद्दल

पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेले दत्ता फुगे गोल्ड मॅन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. अंगावर 5 ते 6 किलो सोनं तसंच त्यांनी सोन्याचा शर्ट शिवला होता. तेव्हापासून ते खूप लोकप्रिय झाले होते. मात्र आर्थिक व्यवहार प्रकरणात त्यांचा खून झाला होता. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

पाहा सम्राट मोझे कोण होते-

पुण्याचे गोल्डमॅन अशी ख्याती असलेल्या सम्राट मोझे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पुण्यातल्या सह्याद्री रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.सम्राट मोझे हे माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे होते. सम्राट यांची दागिने घालण्याची पद्धत वेगळी होती. ते एकाचवेळी 8 ते 10 किलो सोने आपल्या अंगावर घालत असत. म्हणून त्यांची ओळख पुण्याचे गोल्डमॅन अशी झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!

-“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”

-पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन

-योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत

-मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

IMPIMP