पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; अजित पवारांनी केला शुभारंभ

पुणे |  राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा शुभारंभ पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते.

आज सकाळी 11 वाजता अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपाहारगृहात या योजनेचा शुभारंभ केला. तेव्हा आजपासून पुण्यात शिवभोजन थाळीला सुरूवात झाली आहे.

पुण्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी??-

-पुणे महापालिकेतील टेल निशिगंधा

-कौटुंबिक न्यायालय

-महात्मा फुले मंडई

-स्वारगेट एसटी स्टँड

-गुलटेकडीतील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा नंबर 11

-कात्रजमधील जेएसपीएमचे उपहारगृह

-हडपसरच्या गाडीतळमधील शिवसमर्थ भोजनालय

पिंपरी चिंचवडमध्ये कुठे मिळणार शिवभोजन थाळी??-

पिंपरी चिंचवडच्या महापालिकेतीलं उपहारगृह

पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण

यशवंतराव चव्हाण रूग्णालय

वल्लभनगर रूग्णालय

महत्त्वाच्या बातम्या-

-चिदंबरम यांना अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव!

-केंद्रावर प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर शरद पवारांच्या घराची सुरक्षा कायम!

-उद्धव ठाकरे अनुभवशून्य, त्यांच्या कार्यकाळात राज्य अधोगतीकडे जाईल- नारायण राणे

-…तर फडणवीसांनी अगोदरच NIA कडे तपास का दिला नाही- प्रकाश आंबेडकर

-“जे माझे अंगावर येतात त्यांना मी सांगतो, तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही!”