दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च

पुणे | महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक यासारखी महत्वाची शहरं कोरोनामुळे बेजार झाली आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. 31 मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवण्यात आला आहे. या काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.

समाजाच्या अनेक स्तरातून लोकं या कामगार व मजुरांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. पुण्यात रिक्षा चालवणाऱ्या अक्षय कोठावले या तरुणाने आपल्या लग्नासाठी जमवलेली 2 लाखांची रक्कम मजूरांच्या जेवणाची सोय करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

मजुरांना मदत करण्यापर्यंतच अक्षय थांबलेला नाही, आपल्या परिसरातील बुजूर्ग व्यक्ती, गर्भवती महिलांना त्यांच्या दवाखान्यापर्यंत मोफत पोहचवण्याचं कामही अक्षय करतोय.

दरम्यान, आपल्या मित्रांच्या सहाय्याने लग्नासाठी जमवलेले 2 लाख रुपये अक्षयने जेवण बनवण्यासाठी खर्च केले आहेत. जेवणाची पाकीट तयार केल्यानंतर अक्षय रिक्षामधून गावाकडे निघालेल्या मजुरांना वाटायला जातो. दररोज 400 लोकांच्या जेवणाची जबाबदारी अक्षय आणि त्याच्या मित्रांनी घेतलेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

-माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

-अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

-मुख्यमंत्री कमी पडत आहेत असं मी म्हणालोच नाही- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोना झाल्याचं कळलं तेव्हाच मी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये…-जितेंद्र आव्हाड