पुणे महाराष्ट्र

ईस्ट हो या वेस्ट… भारतात राहण्यासाठी ‘पुणे’च सर्वात बेस्ट…

पुण्याने देशात जगण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत पुणे जगण्यासाठी सर्वाधिक चांगले शहर असल्याचं म्हटलं आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या यादीत राजधानी दिल्ली थेट 65 व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही यादी प्रसिद्ध केली आहे.

जगण्यासाठी सर्वोच्च 10 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या 3 शहरांचा समावेश आहे. पुण्याशिवाय नवी मुंबई, मुंबई या शहरांनीही क्रमश: दुसरं आणि तिसरं स्थान मिळवलं आहे. ठाणे शहर या यादीच सहाव्या स्थानावर आहे.

शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सुरी यांनी सांगितले.