पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पुण्यातल्या कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत.
पुण्यातल्या कंटेन्मेंट झोनमध्ये 6 दिवस सर्व दुकानं बंद राहणार आहेत. त्यामुळे या भागात एकही दुकानं उघडं दिसणार नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दूध किंवा जीवनावश्यक वस्तू घरोघरी देणे, होम डिलिव्हरी करणे असे पर्याय देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांचं आणि कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच पुणे मनपा प्रशासनाने 11 मे ते 17 मे या 6 दिवसांसाठी या परिसरात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याची कठोरपणे अंमलबजावणी होणार आहे. शनिवारी या परिसरातील रस्ते पत्रा लावून सील करण्यात आले आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून 14 मेपर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व दुकान बंद राहणार आहेत. तर मेडिकल आणि दवाखाने मात्र सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तर मी सेहवागला सोडलंच नसतं- शोएब अख्तर
-भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा
-माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची प्रकृती स्थिर
-‘या’ कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडेला घराबाहेर जाणं महागात पडलं
-मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी