गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाची बातमी; पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज

पुणे | कोरोनामुळे जगभरासह साऱ्या देशात चिंतेचं वातावरण असताना पुण्यातून एक आनंदाची बातमी आली आहे. पुण्यातील ज्या दाम्पत्याला पहिल्यांदा कोरोनाचं निदान झालं होतं त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही एक दिलासादायक बातमी आहे.

दुबईला फिरण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. पुण्यात आढळलेले हे पहिलेच कोरोनाचे रुग्ण होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारसह प्रशासनाची धावपळ उडाली होती.

या कोरोनाबाधित दाम्पत्याला पुण्याच्या संसर्गजन्य आजारांवर उपचार करणाऱ्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर जी लक्षणं दिसत आहेत त्यानूसार उपचार करण्यात आले.

काल या दाम्पत्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची आणखी एक टेस्ट करण्यात आली, ही टेस्टही निगेटिव्ह आल्यानंतर या दाम्पत्याची अखेर नायडू रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, असं असलं तरी महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट अजूनही तसंच आहे.

महत्वाच्या बातम्या – 

३० हजारांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्सची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला, आणखी 5 जणांना लागण

आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

-सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

-पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल