गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. मात्र आज चाचण्यांची संख्या वाढून देखील गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अतिशय कमी रूग्ण सापडले आहेत. पुणे शहराच्या दृष्टीने ही अतिशय सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

पुण्यात आज दिवसभरात 57 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज 1597 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 57 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 6529 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2259 एवढी आहे. तर आज दिवसरात 168 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. आजपर्यंत एकूण 3950 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर दुर्देवाने आज 06 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातली एकूण मृत्यूंची संख्या 230 झाली आहे.

दरम्यान, पुण्यात 174 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 46 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जिवलग मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानचं भावनिक ट्विट

-आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

-पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

-हार्दिक पांड्या म्हणतो, कुणी तरी येणार येणार गं…!

-‘सरकारने काम केलं नसतं तर…’; गुजरात उच्च न्यायालयाकडून आता सरकारचं कौतुक