धक्कादायक! पुणेकरांनो सावध व्हा, पुण्याने गाठलेला हा आकडा आहे धक्कादायक!

पुणे | संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्र राज्यालाही या महामारीच्या चांगलाच तडाखा बसला आहे. अश्यातच आता पुणेकरांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला मागे टाकत पुणे जिल्ह्याने कोरोनाबाधित ऍक्टिव्ह पेशंटचा सर्वाधिक आकडा गाठला आहे.

अनलॉक नंतर पुण्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होतच होती. त्यामुळे पुण्यात पुन्हा एका आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तरीही पुण्यात रुग्णवाढ कमी झालेली नाही. अनलॉक नंतर पुण्यात रुग्णाच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे.

21 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या 40715 वर पोहचली आहे. राज्यातील सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात असून ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 36810 आहे. तर, मागील 24 तासांत 1512 रुग्णांची वाढ झाली आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये एकही व्हेंटिलेटर बेड कोरोना रुग्णांसाठी शिल्लक नसल्याची घटना समोर आली होती. याबाबत प्रशासनाने सौम्य लक्षणं असूनही खाजगी रुग्णालयांत बेड अडवून बसलेल्या रुग्णांविरोधात कठोर पाऊल उचलली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!

“साहेब मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, तर पावसात भिजूनही पंतप्रधान होता येणार नाही”

धक्कादायक! मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून लहान भावाने उचलले ‘हे’ पाऊल

तैमूर आणि करिनासोबत फिरताना सैफनं घातला नाही मास्क; ट्रोल झाल्यावर दिलं ‘हे’ कारण

महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?