पुणे | मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या ही जवळपास 10 हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 247 इतकी आहे, तर जिल्ह्यात 2 हजार 572 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत 20 हजार 270 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
मे अखेरपर्यंत फक्त पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या ही 10 हजाराच्या जवळपास पोहोचलेली असेल, असं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही हॉटस्पॉट असलेल्या भागात नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी
-…म्हणून साई पल्लवीने धुडकावलं 2 कोटी रुपयांचं मानधन
-कौतुकास्पद! शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार
-केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा- देवेंद्र फडणवीस
-लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार; ‘या’ अटींसह प्रवास शक्य