मोठी बातमी! पुण्यातील गुंडगिरी संपणार, पोलीस आयुक्तांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pune Crime News l गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात क्राईम घटना घडत आहेत. अगदी नुकतीच शरद मोहोळ आणि मारणे या गँगमधील वादामुळे कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. याशिवाय गेल्या महिन्यात पुणे शहरात कोयता गँगचाही उपद्रव सुरु असल्याची घटना घडली आहे. या सर्व पार्श्ववभूमीचा विचार करता पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली असल्याचे दिसत आहे. (Pune Crime Breaking News )

मात्र पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता राज्य सरकारने व गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या गुन्हेगारीला आला बसण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे अमितेश कुमार (Amitesh Kumar) ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी पुणे शहरात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट म्हणजे काय आहे हे सर्वाना माहित असणं गरजेचं आहे. तर आपण यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात…

Pune Crime News l क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट काय आहे? :

पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमितेश कुमार यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता पुण्यातील गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याचे समोर आहे.

क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटमुळे कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासर्व घटनांमुळे सलग 2 दिवस सुरू असलेल्या गुन्हेगारांच्या परेडमुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील बळ मिळणार आहे. (Pune Crime Breaking News )

Pune Crime News l दोन दिवस गुन्हेगारांची परेड :

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवस गुन्हेगारांची परेड घेतली आहे. यामुळे आता गुन्हेगारांवर कडक कारवाई होणार आहे. गुन्हेगारांना नुसती अटक नाही तर कडक कारवाई देखील केली जाते, हे दाखवण्यासाठी दोन दिवस परेड घेतली गेली.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी सांगितले की, पुणे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. कायदा कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना सर्व गुंड आणि गुन्हेगारांनी दिल्या आहेत. (Pune Crime Breaking News )

News Title : Pune Crime News

महत्वाच्या बातम्या – 

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याचे हे आहेत सोपे मार्ग; बँकांपेक्षा मिळेल जास्त व्याजदर

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! नशीब चमकणार; या 3 राशींच्या धनात होणार वाढ

Jasprit Bumrah News l बुम बुम बुमराहने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

Share Market Tips l शेअर मार्केट कोसळण्याची नेमकी कारणे कोणती? मार्केटने ‘हे’ संकेत दिसल्यास वेळीस व्हा सावध

Poonam Pandey l अभिनेत्री पूनम पांडे संदर्भात मोठी बातमी समोर! सरकारने दिला नकार