पुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू; बचावमोहिमेत जवानानेही गमावले प्राण

मुंबई | ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून खड्ड्यात गाडल्या गेलेल्या मजुराचा मृत्यू झाला, तर बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानालाही प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यात पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी भागात हा प्रकार घडला.

ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने तीन मजूर पंधरा ते वीस फूट खोल खड्डयात अडकले होते. त्यापैकी दोघा मजुरांना बाहेर काढण्यात आलं. मात्र 22 वर्षीय नागराज जमादार या मजुराचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील विशाल जाधव या अग्निशमन दलाच्या जवानालाही बचावकार्यादरम्यान प्राण गमवावे लागले आहेत. निखिल गोगावले, सरोज पुंड हे जवान आणि ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे हे मजूर जखमी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, एनडीआरएफ, अग्निशमन दल, आणि पोलिसांना तब्बल बारा तासांच्या परिश्रमाननंतर मजुराचा मृतदेह बाहेर काढता आला. रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

महत्वाच्या बातम्या-