कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर- अजित पवार

पुणे | पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील ‘झुंबर हॉल’ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरांसह इतर अधिकारीही उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलत होते.

कोव्हिड-19 स्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 90 लाख 97 हजार रुपयांचा, तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख 6 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 7 कोटी 15 लाख 81 हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

-भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला- कंगणा राणावत

-जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं?- राहुल गांधी

-“पंतप्रधानपद सोडा… पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा”

-आम्ही मजबूर नाही तर मजबूत आहोत, महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे