Pune: चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर आज चप्पल फेक झाल्याची घटना घडली आहे. यावरुन सध्या वातावरण चांगलंच पेटलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेले असताना हा सर्व प्रकार घडला.

चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

मला एका गोष्टीचं दुःख आहे. की, मराठा आरक्षणाकरता ज्या अण्णासाहेब पाटलांनी सर्वस्व पणाला लावलं आणि आपला जीव दिला. अक्षरशः बलिदान दिले. अण्णासाहेब पाटलांच्या पुतळ्याच्या उदघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम आणि अटलजी यांना विरोध होण्याचं काम होत असेल, तर कुठेतरी यांची बुद्धी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे, असं फडणीवस यांनी म्हटलं.

चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, असं म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल चढवला आहे.

कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघते, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करतायेत. एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत अन् दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची, असं म्हणत फडणवीसांनी मविआ सरकारला फटकारलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकणारी व्यक्ती कोण आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. त्याविषयी पोलीस चौकशी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक, वाचा काय आहे प्रकरण 

  IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर

  “ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त”

  “पंतप्रधान मोदीच देव असल्यासारखं भाजपचं वर्तन” 

  “82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत…”