पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आज सेवानिवृत्त; मला सुद्धा अनेक आजार आहेत पण मी…

पुणे | पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता. त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेत आपले अनुभव सांगितले.

मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही. पॉझिटिव्ह आणि योग्य दक्षता घ्यावी. असा सल्ला दीपक म्हैसेकर यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं, हे त्यांचे मोठेपण आहे, सर्वजण इतर अधिकारी सुद्धा आपल्या परीने काम करत आहे, सध्या आरोग्य यंत्रणेवर फार ताण आहे, असं म्हैसेकरांनी सागंतिलं.

चांगलं काम करत असताना राजकीय आरोप झाल्यावर आम्हाला पण वाईट वाटतं. आम्ही सामान्य नागरिकांसाठी काम करतो, तर ते लोकप्रतिनिधी असतात. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. मात्र, चुकीचा आरोप झाला तर दुःख हे वाटतं असल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, काल झालेल्या बैठकीनंतर आमची अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक झाली. आमच्या चुका किंवा रिपोर्टिंगमध्ये काही समस्या असेल तर त्या दूर केल्या जातील, अशी माहिती दीपक म्हैसेकरांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

घरात सोनं ठेवताय? आता सरकारला द्यावी लागू शकते घरातील सोन्याची माहिती

कोरोना पॉझिटिव्ह आईने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म; बाळांचे रिपोर्ट आले…

भाजपला झाली लगीनघाई पण जोडीदारीण मिळेना, उद्यापासून लॉकडाऊन तोडा- प्रकाश आंबेडकर

कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारा विद्यार्थी अखेर झाला मॅट्रीक पास!

‘कोहलीला अटक करा’; उच्च न्यायालयात याचिका दाखल