पुणे महाराष्ट्र

पुण्यातील इंजिनिअर तरुणीवर अडीच महिने घरात डांबून बलात्कार

पुण्यातील 27 वर्षीय इंजिनीअर तरुणीला तब्बल अडीच महिने घरात कोंडून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सय्यद आमीर हुसेन असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो मुंबईतील अंधेरीचा रहिवाशी आहे. पीडित तरुणीनं त्याच्या घरातून पळ काढत पुण्यातील आपल्या बहिणीचं घर गाठलं आणि आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी सय्यद आमीर हुसेनला अटक केली आहे. 

नेमका काय घडला प्रकार?

एका सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली होती. पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता तिला गोड पदार्थातून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळण्यात आलं होतं. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले तसंच त्याचं शुटिंग देखील करण्यात आलं. तरुणी शुद्धीत आल्यानंतर हुसेनने तिला मोबाइलमध्ये केलेलं बलात्काराचं शुटिंग दाखवलं. हा व्हिडीओ दाखवून त्यानं तिला ब्लॅकमेल देखील केलं. 30 जूनपर्यंत त्याने तरुणीला आपल्या घरात कोंडून ठेवलं. यादरम्यान तो तिच्यावर सतत्याने बलात्कार करत होता. चामडी पट्ट्याने तिला मारहाणही केली जायची. त्याने तरुणीचं डेबिट कार्ड काढून घेत होतं. त्यातून त्याने 40 हजार रुपये देखील काढून घेतले होते.

सोडून दिलं मात्र पुन्हा घरी येण्यास भाग पाडलं-

30 जूनला आरोपी हुसेनने पीडितेला सोडून दिलं होतं. मात्र यादरम्यान तो तिचा सतत माझा पाठलाग करत होता. त्याने फोन करुन घरी आली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. 3 जुलैला त्याने मला पुन्हा त्याच्या घरी जाण्यास भाग पाडलं, असं पीडित तरुणीने तक्रारीत सांगितलं आहे.

तरुणीला का डांबून ठेवलं होतं?

आरोपी तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याला नकार दिला होता. आरोपी तिला कपड्याच्या सहाय्याने बांधून लैंगिक अत्याचार करत होता. जर लग्न केलं नाही तर तुला देहविक्री करणाऱ्या लोकांकडे विकू, अशी धमकीही त्याने तिला दिली होती. आरोपी हुसेनने आपण याआधी अशाच प्रकारे दोन तरुणींना लक्ष्य केलं होतं, असं तरुणीला सांगितल्यांचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अखेर आरोपीच्या घरातून पळ काढला-

25 ऑगस्ट रोजी तरुणीनं आरोपी हुसेनच्या घरातून पळ काढला. ती थेट पुण्यातील बहिणीकडे आली. नातेवाईकांनी तिला कोथरुड पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. 1 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. कोथरुड पोलिसांनी प्रकरण ओशिवारा पोलिसांकडे वर्ग केलं. आरोपीला अंधेरी न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

IMPIMP