महाराष्ट्र मुंबई

पुण्यातील गहुंजे बलात्कारप्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

मुंबई : पुण्यातील गहुंजे येथील बीपीओ कर्मचारी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

दया अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर फाशीच्या अंमलबजाणीला विलंब झाल्याच्या कारणावरुन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

1 नोहेंबर 2007 रोजी ज्योती चौधरी या वाहनातील कंत्राटातून नाईट ड्यूटीसाठी जात होत्या. त्यानंतर कारचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदिप कोकाटे या दोघांनी गाडी अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता. 

ज्योती यांचा गळा आवळून हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून चेहरा ठेचून विद्रुप केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने त्यांना 2012 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. 

आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर त्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या याचिकाही फेटाळल्या होत्या. 

न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली आहे. त्यावर राखून ठेवलेला निकाल आज देण्यात आला. 

न्यायालयाने या दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करुन तिचे जन्मठेपेत रुपांतर केले. त्यांना आता 35 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार असल्याची माहिती युग चौधरी यांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-चहूकडून टीकेची झोड उठल्यानंतर ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा!

-मनसेची ‘ही’ भूमिका आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-रोहित-विराटच्या वादाला नवं वळण; विराट पत्रकार परिषद घेणार!

-उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

-“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

IMPIMP