पुणे आंतरराष्ट्रीय मेरेथॉन यावर्षीही विदेशी खेळाडूंनीच गाजवले

पुणे: पुण्यात आंतरराष्ट्रीय मेरेथॉन स्पर्धा झाली. 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षीही विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पहायला मिळाले. या स्पर्धेचे आयोजन हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी केले होते.

पुरूष गटाचे विजेतेपद इथिओपीयाच्या सोलोमन याने पटकावले आहे. स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

पुण्यात आंतरराष्ट्रीय मेरेथॉन स्पर्धा ही 1983 पासून भरवण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने देश-विदेशातील स्पर्धक यामध्ये सहभागी होतात. या स्पर्धेचा उद्देश हा समाजप्रबोधन आणि सामाजिक संस्थासाठी निधी गोळा करणे हा आहे.

मेरेथॉन स्पर्धा साडेतीन किलोमीटर चॅरिटी रन, पाच किलोमीटर मुले आणि मुली, 10 किलोमीटर पुरूष आणि महिला, 21 किलोमीटर पुरूष आणि महिला तसेच 42 किलोमीटर पुरूष या टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली.

महत्वाच्या बातम्या-