पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे.

दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोनाचे रूग्ण आढळळ्याने संपूर्ण पुण्यात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.  कोरोनामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्याचं कळतंय.

दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सगळ्यांनी काळजी घ्या. या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असं महापौर मुरलीधर मोहळ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील

-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील

-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील

-“आता आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात रस नाही”

-“पुढच्या 48 तासात शिवराज सिंह सत्ता स्थापनेचा दावा करतील”