पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. तसेच ती नियमावली पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुण्यात देखील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे पुणे प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांसाठी 80 टक्के बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधीत ट्वीट करत माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ ट्वीट करत म्हणाले की, कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील  80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, लसीकरण मोहिमेला व्यापक रूप देणे, यावर सविस्तर आढावा घेतला.

शहरातील सर्व खासगी रुग्णालयाचे 80 टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 7000 हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे 5 हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी 1 हजार 250 बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय 1 हजार 450 बेड्सची तयारी सुरु आहे, अशी माहीती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. देशात कोरोना लसीकरण चालू झालं आहे. कोरोना लस सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.

देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जात आहे. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

नाशिक शहरात परिस्थिती गंभीर! कोरोना रुग्णांना बेड न मिळाल्यानं महापालिकेसमोरंच रुग्णांचं ठिय्या आंदोलन

…अन् जंगलाचा राजा पाण्यातील बदकासोबत खेळू लागला; पाहा व्हिडीओ

‘वाह! क्या बात है’; या मुंगुसाचा अभिनय पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल, पाहा व्हिडीओ

‘या’ देशाचे राष्ट्रपती महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायला गेले अन्…; पाहा व्हिडीओ

“आज मा.बाळासाहेब असते, तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिले असते”