पुण्यनगरीचे महापौर पुन्हा चर्चेत! ‘हा’ बहुमान मिळवणारे देशातील पहिले महापौर

पुणे | राजकारणी नेते आपण कधीकाळी लाखांच्या जनसमुदायांसोबत चालताना पाहिले आहेत. एक काळ होता ज्या काळात महाराष्ट्रात लोकनेते होते. आताही आपल्या राज्यातील नेते प्रसिद्ध होत आहेत माध्यम मात्र दुसरं आहे.

राजकारण आज सोशल मीडियाच्या वापरामुळं अधिक लोकाभिमुख झालं आहे. राजकारणी विविध सोशल मीडिया साधनांच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात असतात.

सोशल मीडिया सध्या नागरिकांचं नेत्यांशी संपर्क करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम बनल आहे. परिणामी नेतमंडळी या सोशल मीडियाचा पुरेपुर लाभ घेत आहेत.

आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळं संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्याचं प्रथम नागरिक हे पद भुषवणारे महापौर मुरलीधर मोहोळ एक प्रसिद्ध राजकीय व्यक्तीमत्व आहेत.

अशातच आता मुरलीधर मोहोळ यांनी अजुन एक बहुमान आपल्या नावावर केला आहे. ट्विटर या सोशल मीडिया माध्यमावर मोहोळ यांच्या फाॅलोअर्सची संख्या लाखापेक्षा अधिक झाली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाच्या काळात आपल्या सोशल मीडियाचा अगदी प्रभावी वापर केला आहे. पुणे शहरातील कोरोना परिस्थितीची सर्व माहिती मोहोळ आपल्या खात्याच्या माध्यमातून नागरिकांना कळवत होते.

शहरातील कसलीही समस्या असो मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियावर आलेल्या सुचनांना अधिक गांभिर्यानं घेतलं असल्याचं त्यांच्या टविटर खात्यावरून दिसून येतं.

अवघ्या देशातील महापौरांमध्ये मोहोळ यांनी ट्विटरवर अधिक लोकप्रियता मिळवली आहे. ही येणाऱ्या काळात भाजपमध्ये त्यांच्या अधिक चांगल्या संधीची वाट असल्याचं बोललं जात आहे.

ट्विटरवर सर्वाधिक फाॅलोअर्स असलेल्या महापौरांमध्ये पहिल्या क्रमांकावर मुरलीधर मोहोळ, दुसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तर तीसऱ्या क्रमांकावर हैदराबादच्या महापौर विजयालक्ष्मी गडवाल या आहेत.

दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांची गणना सध्या भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये करण्यात येत आहे. त्यांच्याच नेतृत्वात आगामी काळात भाजप पुणे महापालिका निवडणूक लढवणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

 “चार दलितांना मंत्रिपदं देणं हा तर काॅंग्रेसचा दिखाऊपणा आणि भंपकपणा आहे”

 “या सरकारचा किमान-समान कार्यक्रम म्हणजे वसूलीचा कार्यक्रम”

गहलोतच राजस्थानचे पायलट! राजस्थान काॅंंग्रेसचा कलह संपला

 “उगाच माथी भडकाऊ नयेत, फडणवीसांनी थोडा संयम बाळगायला हवा”

 विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी! प्रमोद महाजन यांची जागा घेणारे दुसरे नेते ठरले तावडे