पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

पुणे |  पुणे शहरातील वाढतं कोरोनाचं संक्रमण हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णत: प्रयत्न करत आहेत. मात्र पुण्यात दररोज 100 किंवा त्यापेक्षा अधिक रूग्णांची वाढ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

पुणे शहरातील आणि विशेषतः अतिसंक्रमित भागात जास्तीत जास्त स्त्राव नमुने तपासले जावेत, यासाठी दैनंदिन टेस्टिंग संख्या अधिकाधिक वाढवावी, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज पुणे शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या तसंच 18 तारखेपासून सुरू होणारा चौथा लॉकडाऊन याविषयी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पुण्याच्या महापौरांच्या मागणीला अजित पवार यांनी देखईल सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. पुण्याच्या दोन-चार भागांत (भवानी पेठ-कसबा-ढोले पाटील रोड-येरवाडा) रूग्णसंख्या वाढते आहे. प्रशासन या भागांत आता कसून तपासण्या करेल असं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्राने सावकाराचं काम करू नये; मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे- राहुल गांधी

-10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

-अरविंद शाळीग्राम यांच्याकडे दिलेला पुणे विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार रद्द करा- राजेंद्र विखे

-शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…