पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बंद राहणार; जाणून घ्या वेळ पाहा आणि पर्यायी मार्ग

Pune-Mumbai Expressway l पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज (13 फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई जाणाऱ्या सर्व (Pune-Mumbai Expressway) प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच आज या महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यायाच कारणामुळे हा द्रुतगती मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत देण्यात आली आहे. (Pune-Mumbai Expressway)

असा असेल पर्यायी मार्ग :

सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील म्हणजेच पुण्याहुन मुंबईकडे येणारी हलकी स्वरूपाची वाहने मुंबई वाहिनीवर वळवण्यात येणार आहे. तसेच त्याठिकाणाहून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग या जुन्या पुणे-मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील. (Pune-Mumbai Expressway)

Pune-Mumbai Expressway l पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील म्हणजेच पुण्याहुन मुंबईकडे येणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिटजवळून वळवून राष्ट्रीय महामार्ग जुना पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Pune-Mumbai Expressway l इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचे फायदे :

– ITMS मुळे वाहनं टेक्नॉलॉजीशी कनेक्ट असायला हवं आहे.
– ITMS मुळे वाहनाला GPS सारखे सेन्सर लावले जातील.
– ब्लुटूथ आणि WIFI चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.
– CCTV द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाण्याची शक्यता आहे.
– जड स्वरूपाची वाहने द्रुतगती मार्गावर पार्क आहेत का याची कल्पना सेन्सरमुळे समजेल.
– जर कधी अचानकपणाने अपघात झाला तर त्याची माहिती अगदी काही वेळातच लक्षात येईल आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत पोहचेल.
– या प्रकल्पासाठी तब्बल 340 कोटींचा खर्च होऊ शकतो.

News Title : Pune-Mumbai Expressway

महत्वाच्या बातम्या –

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता

आता जबरदस्त आवाजात गाणे ऐकता येणार! Redmi Buds 5 लाँच

पुण्यात ‘डासांचे वावटळ’, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून पुणेकर थक्क

नागरिकांनो पेट्रोल पंपावरील फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा!

या नेत्याला मराठ्यांचं काहीही देणे-घेणे नाही… मनोज जरांगेंची प्रकृती खालावली