ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल

मुंबई | सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु आहे. पहिल्या तीन लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत.

22 मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते 31 मे पर्यंत कायम राहतील. मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिक, सोलापूर, मालेगाव, नागपूर, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. या महापालिकांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भाग रेडझोन बाहेर असेल.

दरम्यान, कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येईल.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-तुम्ही कोणत्या झोनमध्ये? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

-“सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा”

-चीनपासून वेगळं असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला इशारा

-शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं- देवेंद्र फडणवीस

-इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस