Top news पुणे महाराष्ट्र

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

muralidhar mohol std 1

पुणे | राज्यात कोरोनाचा (Corona) दररोज उद्रेक होताना दिसत आहे. पुण्यात (Pune) तर एका दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या (Corona Virus) आकड्यांनी सर्वच रेकॉर्ड मोडले होते.

पुण्यात काल दिवसभरात सर्वाधिक 2 हजार 757 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. पण, पुणेकरांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मात्र रुग्णसंख्येला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केली जाणार आहे.

महानगरपालिकेचा सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या महितीनूसार या रुग्णसंख्येची वाढत पाहता सार्वजनिक ठिकाणी होणार संसर्ग रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

महानगरपालिका सणस मैदान, नायडू रुग्णालय , लायगुडे हॉस्पिटल यांसह शहरातील 12 ठिकाणी स्वब सेंटर ( चाचणी केंद्र कार्यरत आहेत याबरोबरच येत्या दोन दिवसात महापालिकेच्या पाच विभागानुसार कोविड केअरसेंटर सुरु केली जाणार आहेत.

ज्या नागरिकांना विलगीकरण राहण्याची सोय नाही, अश्या लोकांसाठी या सेंटरचा वापर केला जाणार आहे. जवळपास 250 खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. गेल्या आठवडाभरात शहरातील करोना संसर्गाच्या दरात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आठवड्यात रुग्णसंख्या पाच टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर पोहचली आहे. वाढत्या संख्येमुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही वाढत आहे.

शहरातील कोरोना रुग्ण संख्येबरोबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही वाढ आहे. मात्र या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी साधा ताप, सर्दी, खोकला यांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सेक्स रॅकेटमध्ये अटक झालेल्या थायलंडच्या तरूणींचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘जेंडर चेन्ज करून’ 

…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे 

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज