Pune News | पुण्याच्या चाकण परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत कैलास स्टील कंपनीच्या (Kailas Steel Company) मालकावर गोळीबार झाला असून, गोळी त्यांच्या पोटात लागली आहे. या गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. चाकण औद्योगिक वसाहतीत ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
गोळीबाराचा थरार –
चाकण औद्योगिक वसाहतीत (Pune News) घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागली आहे. दोन अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोर आले आणि त्यांनी कंपनीच्या गेटवरूनच कंपनीच्या मालकावर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
“हा माझ्यासाठी शेवटचा दिवस…”, सलमान खानच्या वक्तव्याने चाहते चिंतेत!-
मुख्याध्यापक आणि शिक्षकेचे अश्लील चाळे, शाळेतला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!-
नेमकं काय घडलं?
चाकण (Pune News) एमआयडीसी परिसरात आज (20 जानेवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कंपनी मालक अजय सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यामागचे कारण हल्लेखोरांना अटक केल्यानंतरच समोर येईल.
आरोपींच्या शोधासाठी 10 पथके तैनात-
खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, जखमी असलेल्या कंपनी मालकांनी तशी मागणी कोणाकडूनही झाली नसल्याचे म्हटले आहे. अजय सिंग यांच्यावर सकाळी पावणे अकरा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी असून दोघांकडून हा हल्ला करण्यात आला आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलीस व गुन्हे शाखेची 10 ते 12 पथके कार्यरत झाली आहेत. “कंपनीचे मालक प्रत्यक्ष जखमी, व कंपनीतील इतरांशी आम्ही चौकशी केली असून हा हल्ला खंडणी किंवा व्यवसायातून झालेला नाही असे प्रथमदर्शनी दिसून येते.
त्यामुळे, याप्रकरणात हल्लेखोराचा नेमका हेतू काय, याचा तपास आम्ही करत आहोत,” अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवडचे डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे. या घटनेमुळे चाकण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.